सातारा: क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून दुचाकी चोरी, सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Sep 21, 2025 क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून २० हजार रुपयांची स्प्लेंडर क्रमांक एमएच ११ बीडब्ल्यू २२५५ ही जितेंद्र विठ्ठल मोझर रा. वाढे याच्या मालकीची अज्ञात चोरट्याने दि. १८ सप्टेबर रोजी दुपारी ४.३० ते ५ या दरम्यान चोरुन नेली. त्याबाबत अज्ञात चौरट्याच्या विरोधात दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास महिला पोलीस हवालदार सावंत या करत आहेत.