गंगाखेड: राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शासकीय वाहनावर शाई फेक करणाऱ्यांविरुद्ध गंगाखेड पोलीसात गुन्हा दाखल
राज्य सरकार शेतकरी प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप करीत गंगाखेड येथे राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शासकीय वाहन क्रं - एचआर ९८ डब्ल्यू ३४५६ या वाहनावर दोन युवकांनी त्याच्या हातातील बाटलीमधील काळ्या रंगाची शाई तर दुसऱ्याने हातामध्ये रेड ऑक्साईड स्ट्राइक हायग्लोजचा डब्बा गाडीवर फेकला. दोघांनाही गंगाखेड पोलिसांनी क्षणार्धात ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी दत्ता चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.