धर्माबाद: कारेगाव फाटा येथे ना. बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट सभा संपन्न, मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्तित
मागील अनेक दिवसापासून शेतकरी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या विविध मागण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण कारेगाव फाटा येथे सुरु होते, ह्या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजरोजी दुपारी 3 च्या सुमारास प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष ना. बच्चू कडू यांनी भेट दिली असता यावेळी भेटीचे रूपांतर विराट सभेमध्ये झाले होते, यावेळी बिलोली उमरी नायगाव धर्माबाद तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.