पतंग उडविताना उच्च व लघुदाब वीजवाहिन्या, खांब तसेच वीज यंत्रणांपासून दूर राहण्याचे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कटलेले पतंग काढण्यासाठी काठ्या, लोखंडी सळी किंवा धातुमिश्रित मांजाचा वापर करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी व पालकांनी दक्ष राहून सुरक्षित व मोकळ्या मैदानातच पतंगोत्सव साजरा करावा, असे अकोला महावितरण परिमंडळाने दिनांक १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.