नागपूर ग्रामीण: क्रूरता! प्रतिकार केला म्हणून वृद्धाचा गळा आवळला; चोरीसाठी आलेल्या तिघांनी मिळून केला घात
वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुराबर्डी परिसरात एका ६० वर्षीय दिव्यांग वृद्धाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या तीन तरुणांनी हे कृत्य केले.मृतक साहेसराम बाजीराव केवट (वय ६० वर्षे) हे दिव्यांग असून एकटेच राहत होते.१३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२:३० ते १:०० च्या दरम्यानआरोपी विलास सुभाष चौधरी , जितेंद्र संतोष वगारे, प्रविण ढिल्लन चव्हान या आरोपींनी पैशांच्या हव्यासापोटी साहेसराम यांच्या घरात प्रवेश केला.