भोकरदन: महात्मा फुले चौकात कृषी सेवा केंद्रातून चोरीला गेलेली दुचाकी सिपोरा परिसरात काढली शोधून, चोरट्याला ठोकल्या बेड्या
आज दिनांक 14 जून 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीत सिपोरा परिसरात तून दुचाकी शोधून काढली, ही दुचाकी 12 जून 2026 रोजी महात्मा फुले चौक सरोदे ऍग्रो समोरून चोरीला गेली होती यावरून रमेश एकनाथ सरोदे यांनी पोलिसात तक्रार दिली होती, यामध्ये सीसीटीव्ही च्या आधारे शोध घेत अंबादास भिका गावंडे पाटील यांनीही चोरून नेल्याची निष्पन्न त्याच्या ताब्यातून दुचाकी भोकरदन पोलिसांनी जप्त करून कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.