15 जानेवारीला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील प्रभाग क्रमांक ३५ मध्ये असलेल्या 'सक्सेस पॉईंट स्कूल' येथील मतदान केंद्रावर गुरुवारी सायंकाळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मतदान प्रक्रिया संपण्याच्या सुमारास एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला केंद्रात प्रवेश देण्यात आल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे मतदान केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.