समुद्रपूर: गिरड येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने प्रार्थना मंदिरात योग शिबीर आयोजित करून योग दिवस साजरा
जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून गिरड येथील प्रार्थना मंदिरात योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले या योग प्राणायाम आसन शिबिराचे मुख्य मार्गदर्शक डॉ.राजेंद्रजी मुडे डॉ. रवींद्रजी डरे डॉ. विजयजी खोंड डॉ. नथुजी भिसेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये गिरड नगरीतील विद्यार्थी व ग्रामस्थ यांना योग प्राणायाम आसन याविषयी मार्गदर्शन प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आले.