समुद्रपूर: जाम तृप्ती हॉटेल जवळ साळ्याने जावयावर धारधार शस्त्राने वार करून केले जखमी: पोलिसांत तक्रार दाखल
समुद्रपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाम येथील तृप्ती हॉटेल जवळ साळयाने जावयावर धारधार शस्त्राने वार करून जखमी केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाला आहे.यासंबंधी जखमी बंटी नारायण शिंदे राहणार सेलू घोराड यांने दिलेल्या बयाणा नुसार त्याच्या सासऱ्याकडे पुजेचा कार्यक्रम होता यावेळी त्याचा साळा व तो नाचत असताना एकमेकांना धक्का लागला यावेळी साळयाने जावयास शिवीगाळ करून थाम मी घरून येतो म्हणत घरून येऊन कमरेला धारधार शस्त्र आणुन बंटी शिंदे यांच्या पायावर वार करून जखमी केले.