समुद्रपूर: तास येथे बैलगाडी समोर डुक्कर आल्याने बुजाडलेल्या दोन बैलाचा विहीर पडून दुर्दैवी मृत्यू:सुदैवाने शेतकरी थोडक्यात बचावला
तास येथे शेतकरी शेतात बैलगाडीने जात असताना बैलगाडी समोर अचानक डुक्कर आल्याने बैल बुजाडले व बैलगाडी घेऊन सैरावैरा पडू लागले. यावेळी दोन्ही बैल विहीर पडून त्यांचा मृत्यू झाला.तर शेतकऱ्याने बैलगाडी वरून उडी मारल्याने ते थोडक्यात बचावले. प्राप्त माहितीनुसार तास येथील शेतकरी ज्ञानेश्वर वैद्य हे बैलगाडी घेऊन शेतामध्ये जात असताना अचानक त्याच्या बैलगाडी समोर डुक्कर आल्याने बैल घाबरून सैरावैरा पडू लागले.यावेळी बैलगाडी अनियंत्रित होऊन गजानन वैद्य यांच्या शेतातील विहीर पडून बैलाचा मृत्यू झाला.