भोकरदन: जुने भोकरदन मुलानी मधील परिसरात आयोजित ईद ए मिलाद कार्यक्रमात माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी लावली उपस्थिती
आज दिनांक 19 एप्रिल 2026 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील जुने भोकरदन येथे नूरानी मज्जित परिसरामध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आयोजित ईद-ए-मिलाद कार्यक्रमांमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थिती लावली आहे, याप्रसंगी त्यांनी मुस्लिम समाज बांधवांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला आहे, यावेळी भोकरदन शहरातील व परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.