बल्लारपूर: बल्लारपुरात व्यापाऱ्याला 28 लाखांनी गंडविले, ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखालील प्रकार
सहज आणि प्रचंड नफा मिळेल, अशा खोट्या आमिषाला बळी पडत एका व्यापाऱ्याची तब्बल २८ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. अज्ञात गुन्हेगारांनी बनावट मोबाइल अॅप, व्हॉट्सअॅप ग्रुप व फसव्या संकेतस्थळाचा वापर करून संगणकीय तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत हा गुन्हा घडवून आणला.