काटोल शहरात आज 'हॅप्पी स्ट्रीट'चे शानदार आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला काटोलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर्सच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली होती.यावेळेस बच्चेकंपनीचे लाडके 'भालू आणि पांडा' देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते, जे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. तरुणाईने आपल्या आवडत्या इन्फ्ल्यून्सर्ससोबत फोटो आणि रिल्स काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती