वणी: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या बुटफेकी घटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे काँग्रेसतर्फे तीव्र निषेध
Wani, Yavatmal | Oct 9, 2025 भारताचे मा. सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई यांच्यावर झालेल्या बुटफेकीच्या घटनेचा वणी काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काँग्रेसतर्फे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.