सातारा: सातारा शहर पोलीस ठाण्याची ऑगस्ट महिन्यात उल्लेखनिय कामगिरी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले कौतुक
Satara, Satara | Sep 16, 2025 सातारा शहर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात उल्लेखनिय कामगिरी केली असून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कौतुक केले असल्याची माहिती सातारा पोलिसांनी मंगळवारी दुपारी दीड वाजता दिली. जिल्हा बेस्ट डिटेक्शन, बेस्ट पोलीस ठाणे मुद्देमाल डिस्पोजल, महिला अत्याचार संबंधिचे दाखल गुन्ह्यात २४ तासाच्या आत तत्काळ दोषारोपपत्र पाठवणे, डायल ११२ ची मध्ये उत्कृष्ट कामगिरी, गुन्हे निर्गती, मिसिंग निर्गती, अकस्मात मयत या आठ प्रकारात चांगले काम केले आहे.