नाशिक: गोदावरी नदीकाठी कचऱ्याचे साम्राज्य..
Nashik, Nashik | Sep 15, 2025 नाशिक येथील पवित्र समजले जाणारे गोदावरी नदीकाठी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे आजूबाजूचे सर्वच व्यापारी वर्ग या पुलावर कचरा टाकत असून येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे यात कचरा वेचणारे यातून काही मिळतं की काय याचा शोध घेत असून बाहेरून येणाऱ्या भाविकांना या कचऱ्यापासून आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.