समुद्रपूर: शेंडगाव उड्डाणपुलासमोरील नाल्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची दुचाकीला धडक, एक दुचाकीस्वार ठार
नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील शेंडगाव उड़ानपुलाच्या समोरील नाल्यावरील पुलाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जबर धडक झाली या अपघात एक दुचाकीस्वार ठार झाला. प्राप्त माहितीनुसार २० मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास मृत्यक रितेश उर्फ सन्नी प्रकाश उईके राहणार दहेगाव हा आपल्या दुचाकी क्रमांक MH 32 AB 6238 ने दहेगावकडून जामकडे जात असताना शेंडगाव उड़ानपुलाच्या समोरील नाल्यावरील पुलाजवळ दुचाकी क्रमांक MH 32 AP 5774 चे चालकाने जबर धडक दिली.