समुद्रपूर: वडगावात वादळीवाऱ्यासह पावसाचा तांडव; अनेक घरांचे छप्पर उडून नुकसान, तर झाडेही कोसळली
वडगाव सुमारास अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले यावेळी अनेक घराचे छप्पर उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तरी अनेक झाडे कोलमडून पडले. प्राप्त माहितीनुसार वडगाव येथे अचानक जोरदार वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली यावेळी वाऱ्याचा चोर इतका प्रचंड होता की पाहता पाहता अनेक घराचे जनावराच्या गोठ्याचे छप्पर उडून घरात पाणी शिरूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर गावातील अनेक झाडे कोलमडून पडले यावेळी सुदैवाने कोण्हालाही इजा झाली नाही.