बारामती: बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणारे दोन आरोपी अटकेत; बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
Baramati, Pune | Oct 16, 2025 बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे.या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे.