मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथे दि. १२ नोव्हेंबर रोजी वरठी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैध मोहफुलाच्या दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी कोमल रामटेके वय ३५ वर्षे रा. मोहगाव देवी याच्या ताब्यातून एकूण ७ लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू एकूण किंमत १ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा वरठी पोलिसांनी तपासात घेतला आहे.