पालघर: बंद पडलेल्या एसटी बसला पारोळ येथे प्रवाशांवर धक्का मारण्याची वेळ; घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल
एसटी महामंडळाची बस वज्रेश्वरी मार्गावर पारोळ परिसरात बंद पडली. रस्त्यातच अचानक बंद पडलेल्या या एसटी बसला बसमधील प्रवाशांना धक्का मारण्याची वेळ आली. बसमधील प्रवाशांनी या एसटी बसला धक्का मारावा लागला. ही घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली असून व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या बसची दुरावस्था व परिवहन महामंडळ विरोधात नागरिक व प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.