कोरेगाव: कोरेगाव तालुक्यात नलवडेवाडी येथे उतारावरून घसरलेल्या ट्रॅक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बिचुकले नजिकच्या नलवडेवाडी येथे एका अत्यंत दुर्दैवी घटनेत चालू स्थितीत निष्काळजीपणे उतारावर ठेवलेल्या ट्रॅक्टरखाली सापडून ७० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव सुरेश आनंदराव नलवडे असे आहे. वाठार पोलिसांनी दिलेल्या सोमवारी रात्री नऊ वाजता दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास सुरेश नलवडे हे आपल्या राहत्या घरासमोर ट्रॅक्टर हा उताराच्या रस्त्यावर चालू अवस्थेत ठेवून पाणी आणण्यासाठी घरात गेले होते.