जालना शहर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. सोमवार दि. 12 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र,जिल्हाधिकारी तथा आयुक्त जालना शहर महानगरपालिका आशिमा मित्तल व पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी जालना औद्योगिक वसाहतीतील सिद्धीकी इंजिनिअरिंग येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्राची संयुक्त पाहणी केली.