सातारा: दुर्गा देवीच्या आगमनाला सुरुवात सदर बाजार येथील भारत माता मंडळाची आगमन मिरवणुकीला राजवाडा येथून सुरुवात झाली
Satara, Satara | Sep 20, 2025 सातारा शहरात दुर्गादेवीच्या आगमनाला सुरुवात झाली असून आज (शनिवार) रात्री आठ वाजता सदर बाजार येथील भारत माता मंडळाची आगमन मिरवणूक ऐतिहासिक राजवाडा येथून सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत ही मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली. सदर आगमन मिरवणूक राजवाडा देवी चौक पोवई नाका मार्गे सदर बाजार पर्यंत काढण्यात आली आगमन मिरवणूक पाहण्यासाठी राजवाडा येथे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.