इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी 31 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, वाद मिटवायला गेलेल्या युवकावर हल्ला करत त्याची दुचाकी हिसकावून फरार होणाऱ्या चार आरोपींना इमामवाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली आहे