जालना: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू; अपघातातील ट्रक जप्त
Jalna, Jalna | Jun 13, 2026 समृद्धी महामार्गावर निधोना शिवारात शनिवार दि. 13 जून 2026 रोजी सकाळी 6 वाजता झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून आलेल्या एका कुटुंबाला ट्रॅव्हल्स बस चालकाने निधोना परिसरात उतरवले होते. त्यानंतर हे कुटुंब समृद्धी महामार्गालगत रस्त्याच्या कडेला वाहनाची वाट पाहत बसून होते.शनिवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास ट्रक क्रमांक एचआर-47-एफ-4651 ने धडक दिली.