भंडारा: "महिलांच्या निवडणुकीत महिलांना लढू द्या, नाहीतर साडी नेसा;" आम. भोंडेकरांनी फुकेंना भरचौकात सुनावले! व्हिडिओ <nis:link nis:type=tag nis:id=Viral nis:value=Viral nis:enabled=true nis:link/>
भंडारा नगरपरिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या कथित घोळाविरोधात भंडाऱ्यात काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आमदार परिणय फुके यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. "महिलांच्या निवडणुकीत महिलांनाच लढू द्या, हस्तक्षेप करायचा असेल तर साडी नेसा," अशा तिखट शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. लोकशाहीत कोणालाही दाबण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा देत भोंडेकर यांनी महिलांना समोर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला. ईव्हीएममधील अन्यायाविरोधात हा जनक्षोभ..