खापरखेडा येथील वीज केंद्रात कार्यरत असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. खापरखेडा वार्ड क्रमांक तीन मध्ये ही घटना घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी खापरखेडा वीज केंद्रात सुरक्षा विभागात कार्यरत होता. वार्ड क्रमांक तीन मधील राहत्या घरी त्याने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.