चिपळुण: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत म्हावशी येथे कवड्या पक्षाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना अटक; १७ लाखाचा मुद्देमाल जप्त
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत जावली तालुक्यातील म्हावशी येथे कवड्या पक्षाची शिकार करणे शिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले असून वन विभागाने त्यांच्या मुसक्या आवळत शिकारीसाठी वापरलेली बंदूक आणि महिंद्रा बोलेरो जीप जप्त केली आहे. वन विभागाच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयातून शनिवारी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार वन्यजीव सप्ताह साजरा करण्यासाठी गेलेल्या बामणोली येथील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.