पनवेल: तळोजा फेज-2 मधीलअल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या; आरोपीला अटक
मावशीच्या पतीनेच केली हत्या
Panvel, Raigad | Sep 21, 2025 तळोजा फेज-2 मधील असावरी हाऊसिंग सोसायटीमध्ये आईसह राहणाऱ्या तमन्ना मोफीजुल शेख या (17) मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे तमन्ना हिची हत्या तिच्या मावशीच्या पतीनेच केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार तळोजा पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे.