पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्री तसेच अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई सुरू असून दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील 19 विविध पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करत एकूण 15 जणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळू 17 लाख 63 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 11 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास पोलीस करीत असून यापुढेही अवैध दारू विक्री दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात येण