बदनापूर: 11 ऑक्टोंबर चा छ.संभाजीनगर येथील उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे स्टंटबाजी आ. नारायण कुचे यांचा भाजपा कार्यालयात टोला
Badnapur, Jalna | Oct 10, 2025 आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत उद्या दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथील मोर्चा म्हणजे हा फक्त स्टंटबाजी असल्याचा टोला लगावला आहे,कारण ज्यावेळी ते पदावर होते त्यावेळी सुद्धा त्यांनी काही केलं नाही, आणि आता तर काहीच नाही,त्यामुळे ही फक्त स्टंटबाजी असल्याचा टोला त्यांनी लगावला.