नागपूर-भंडारा महामार्गावर शनिवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात दोन चुलत-मामे बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला.कामठी तालुक्यातील महालगावजवळील नाग नदीच्या पुलावर एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. मृतकां मध्ये अलिषा अनिकेत मेहर वय २६ वर्ष आणि मोनाली दिनेश्वर घाटोळे वय २७ वर्ष यांचा समावेश आहे. ही घटना शनिवारी दुपारी अंदाजे २:४५ वाजता झालीमिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी अॅक्टिव्हावरून भुगाव येथे एका हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी जात होत्या.