कर्जत: माथेरान घाटात दरड कोसळली
वाहतूक ठप्प
पाच तासांनी वाहतूक सुरळीत
Karjat, Raigad | Sep 15, 2025 नेरळ माथेरान घाटात रात्रभर पाऊस सुरू आहे आणि त्या पावसात माथेरान नेरळ घाटातील नांगर खिंडीत दरड कोसळली. यामुळे पहाटेपासून माथेरान घाट त्यातील वाहतूक थांबली होती. मात्र सकाळी दहा वाजता दरड बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली असून वाहतूक सुरू झाली आहे.