नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुबे नगर परिसरात आज एका भरधाव स्कूल व्हॅनने थेट मेडिकल स्टोअरला धडक दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही व्हॅन दुकानात शिरली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने, या अपघातावेळी व्हॅनमध्ये एकही शालेय विद्यार्थी नव्हता, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.मारुती इको व्हॅन दुबे नगर परिसरातून वेगाने जात होती. अचानक चालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले.