बिलोली: बेळकुनी बुद्रुक येथे 45 वर्षीय व्यक्तीचा खुन; पुरावा नष्ट करण्यासाठी मयतास जाळले; रामतिर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा
Biloli, Nanded | Oct 18, 2025 नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे बेळकुणी बुद्रुक येथे दि 15 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री आठ ते दि 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सहाच्या दरम्यान यातील मयत शंकर बालना मोंडेवाड वय 45 वर्ष यास आरोपी नामे हनुमंत किशन गालेवार याने कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी खून करून मयतास जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी फिर्यादी संगीता भुरेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हराळे करीत आहेत.