उरण शहरालगत असलेल्या पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर संरक्षण कठड्याच्या मोठमोठ्या दगडांचा खच पडल्याने पर्यटकांना किनाऱ्यावर जाण्यास अडचण होत आहे. तर बंधाऱ्याचे दगड कोसळत असल्याने तटबंदी ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. त्यातच उरण तालुक्याला लाभलेला पिरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांसाठी एकमेव किनारा आहे.