हातकणंगले: पट्टणकोडोलीच्या अनंत विद्या मंदिर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना तब्बल ७ भाषा शिकवल्या जातात
सध्याच्या त्रिभाषा सूत्राच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक आगळीवेगळी दिशा दाखवत राज्यभराचे लक्ष वेधून घेतले आहे.येथे ‘श्री बिरदेव एज्युकेशन सोसायटी’च्या अंतर्गत चालणाऱ्या ‘अनंत विद्या मंदिर न्यू इंग्लिश स्कूल’ या संस्थेत पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना तब्बल सात भाषा आणि मोडी लिपीचे शिक्षण ऐच्छिक विषय म्हणून दिलं जात आहे,तेही कोणतीही अतिरिक्त फी न आकारता.सध्या या शाळेत सुमारे १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.