जालना: नारायणा ई-टेक्नो शाळेतील विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : मनसे विद्यार्थी सेना आक्रमक; शाळेचा परवाना रद्द करण्याची मागणी
Jalna, Jalna | Jun 14, 2026 जालना शहरातील नारायणा ई-टेक्नो शाळेमधील एका शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याच्या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. या घटनेचा निषेध करत संबंधित शाळेचा परवाना तात्काळ रद्द करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. यासंदर्भात मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणा