गडचिरोली: ग्रामपंचायत दिभना येथे 'मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज' अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
'मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज' अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ ग्रामपंचायत दिभना येथे थेट प्रक्षेपणाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने संपन्न झाला. या प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे प्रामुख्याने उपस्थित होते. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्हिडीओ संदेशद्वारे या अभियानाला शुभेच्छा दिले.