धामणगाव रेल्वे: जळगाव आर्वी येथे वृद्ध महिलेचा गळा आवरून दागिने केली चोरी; युवका विरोधात पोलिसात गुन्हा
शांताबाई मारोतराव गोहत्रे वय 60 राहणार जळगाव आर्वी या महिलेने गौतम गोंडाने याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सदर वृद्ध महिलेच्या घरी गौतम दही घेण्यासाठी आला वृद्ध महिला दही देण्यासाठी घरात गेली असता मागून गौतम आला व वृद्ध महिलेच्या गळ्यात दोरी टाकली व आवडली नंतर तिला खाली पाडले व तोंडावर मारहाण केली त्या दरम्यान महिला बेशुद्ध झाली काही वेळाने शुद्ध आल्यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चौबा कानातले असा 40500रुपयां चे दागिने दिसून आले नाही अशी तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे.