सुधागड: सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी
डोक्याला इजा खांदा फॅक्चर
पालीतील सरसगड किल्ल्यावरून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (ता. 2) सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली आहे. निखिल कदम असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा सातारा येथील असून पुणे येथे नोकरी करतो. या तरुणाच्या डोक्याला इजा झाली असून खांदा फॅक्चर झाला आहे. रेस्क्यू टीमचे सदस्य आपदा मित्र, पोलीस व स्वयंसेवक या ठिकाणी लागलीच पोचले असून या तरुणाला प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. त्याला किल्ल्यावरून खाली आणण्यासाठी रात्र होईल.