लाखांदूर: दोन जिल्ह्याच्या सीमेवरील अडकलेला रस्ता बांधकाम करा. भाजपा तालुका महामंत्री विजय खरकाटे यांची प्रशासनाला मागणी
तालुक्यातील दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची समस्या मागील अनेक दिवसांपासून भडसवत आहे मात्र याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्यामुळे जनतेला सदर मार्गावरून जाताना खूप त्रास सहन करावा लागते त्यामुळे भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना जोडणारा पुयार कोरंबी इंदोरा अरुण नगर या मार्गाची दुरुस्ती करून खडीकरण करण्यात यावी अशी मागणी तालुका भाजपा महामंत्री विजय खरकटे यांनी तारीख 21 नोव्हेंबर रोजी निवेदनातून तहसीलदार यांना केली आहे