जालना: जालन्यात साखळी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार आरोपी जेरबंद, सोन्याचा खरेदीदारही ताब्यात
Jalna, Jalna | Jul 3, 2026 जालना शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या हिसकावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरीचे सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले असून आरोपींकडून ३ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 3 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.१ जुलै रोजी दोन घटना घडल्या होत्या.