शिरोळ: तारदाळची सुन होणे मी माझे भाग्य
समजते - लेफ्टनंट प्रियंका खोत, सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा
तारदाळ मधील प्रियंका खोत या पती निधनानंतर भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंट पदी विराजमान झाल्या आहेत.तारदाळ ग्रामपंचायतच्या वतीने शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता लेफ्टनंट प्रियंका यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार पालकमंत्री प्रकाश आबिडकर,खासदार धैर्यशील माने,आमदार विनयरावजी कोरे, आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते गावाच्या वतीने करण्यात आला असल्याची माहिती आज रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता खोत कुटुंबियांनी दिली.