अंजनगाव सुर्जी: दर्यापूर रोडवर पतंगीच्या बरेली मांझ्याने युवकाचा गळा कापला;युवक गंभीर जखमी
अमरावतीवरून अंजनगाव सुर्जीकडे येत असताना एक युवक पतंगीच्या बरेली मांझ्याचा बळी ठरला आहे. ही धक्कादायक घटना आज (बुधवार) सकाळी सुमारास ११ वाजता दर्यापूर रोडवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सफीउद्दीन सुजउद्दीन (रा.पान अटाई, अंजनगाव सुर्जी) हा युवक दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक पतंगीच्या मांझ्याने त्याच्या गळ्यावर वार केला.यात त्याचा गळा गंभीररीत्या जखमी झाला असून,नागरिकांच्या मदतीने युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले