जालना: पत्रकारांवरील हल्ला नव्हे, तर लोकशाहीवरील हल्ला – नगरसेवक दुर्गेश काठोटीवाले
Jalna, Jalna | Jun 5, 2026 जालना शहरातील दोन पत्रकारांवर झालेल्या कथित हल्ल्यांच्या घटनांमुळे पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक दुर्गेश काठोटीवाले यांनी या घटनांचा जाहीर निषेध करत, "हा केवळ पत्रकारांवरील हल्ला नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणि लोकशाही व्यवस्थेवर झालेला हल्ला आहे," अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा जगाचे जगमित्रचे संपादक संतोष भुतेकर यांना त्यांच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तींनी धमका