नागपूर ग्रामीण: धक्कादायक! एमआयडीसी बुटीबोरी येथे चेंबर सफाई करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू
एमआयडीसी बुटीबोरी येथील सांडपाण्याच्या पाइपलाइनच्या चेंबरमध्ये सफाईसाठी उतरलेल्या दोन कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर आहे. ही घटना १६ मे रोजी सायंकाळी घडली. मृतकांची नावे प्रशांत मनुजे आणि राहुल मडावी अशी सांगण्यात आले आहे.जखमी सुरेश पातेकर चा रुग्णालयात उपचार सुरू आहे.कंत्राटदाराने कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय कामगारांना चेंबरमध्ये उतरण्यास भाग पाडले. कंत्राटदार गौरव पुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.