पुणे शहर: बुधवार पेठेत सोन्याची चोरी; १ कोटी २७ लाखांचा ऐवज गायब.
Pune City, Pune | Oct 18, 2025 – बुधवार पेठेतील प्रिसियस रिफायनरी या सोन्याच्या दुकानात दुपारी साडेबारा वाजता मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दुकानातील लॉकर तोडून अंदाजे १ किलो वजनाचे १० सोन्याचे बिस्किटे, किंमत सुमारे १ कोटी २७ लाख रुपये, अज्ञात इसमाने लंपास केली. फिर्यादींच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारावर संशय व्यक्त करण्यात आला असून तो फरार आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.