औसा: मराठा आरक्षण जीआर रद्द करा, अन्यथा संघर्ष उभा करू – सकल ओबीसी समाजाची तहसीलदार मार्फत निवेदनाद्वारे सरकारकडे मागणी
Ausa, Latur | Sep 15, 2025 औसा-महाराष्ट्र शासनाने आज 15 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार (जी.आर.) मराठा समाजाला ‘कुणबी’ प्रमाणपत्र देत ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषतः ओबीसी समाजात या निर्णयाविरोधात संताप उसळला आहे.सकल ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी सरकारकडे लेखी हरकत नोंदवत हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी आयुष्याच्या तहसीलदारामार्फत सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.